TSK

TSK · उत्प 9:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला:

तथापि, तुम्ही राहता तेथे हरीण, सांबर असे कोणतेही चांगले प्राणी मारुन खाऊ शकता. तुला तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिल्याप्रमाणे ते हवे तितके खा. हे मांस शुद्ध, अशुद्ध अशा कोणत्याही लोकांनी खावे.

तो गुरांढोरासाठी गवत उगवतो, आणि मनुष्यांसाठी वनस्पतीची लागवड करतो; यासाठी की, मनुष्याने जमिनितून अन्न उत्पन्न करावे.

जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.

कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.

¶ “काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.

म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.

शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको