TSK

TSK · हाग्ग 2:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.

राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.

कारण मी आपल्या रागाच्या भरात आवेशाने व आपल्या क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे. इस्राएल देशामध्ये त्या दिवशी खचित मोठा भूकंप होईल.

¶ पारसाचा राजा दारयावेश राजा याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या, सहाव्या महिन्याच्या, पहिल्या दिवशी, शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल यहूदाचा राज्यपाल व यहोसादाकचा मुलगा यहोशवा, मुख्य याजक याच्याकडे हाग्गय संदेष्ट्याद्वारे परमेश्वराचे वचन आले, ते असे,

कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन हालवून सोडीन.

त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.”