TSK

TSK · इब्री 11:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.”

तो म्हणाला, “हे पाहा, मी म्हातारा झालो आहे, माझ्या मरणाचा दिवस मला माहीत नाही.

मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल.

हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.

आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर याकोबाने आपले पाय पलंगावर जवळ ओढून घेतले व मरण पावला, आणि तो आपल्या पूर्वजांकडे गेला.

परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”

¶ या सगळ्या गोष्टी स्वखुशीने अर्पण करण्याची शक्ती असणारा मी कोण? किंवा हे लोक तरी कोण? तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या. तुझ्याकडून मिळाले तेच आम्ही तुला परत करत आहोत.

परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझ्याकडे कान लाव. माझे रडणे ऐक, कारण तुझ्याजवळ परका, माझ्या पूर्वजांसारखा उपरी आहे.

‹मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.”›

¶ यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.

कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?

¶ विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.

तुम्हास प्राप्त होणार्‍या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.

¶ माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.