TSK

TSK · इब्री 9:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ त्यांना शुद्ध करण्यासाठी हे करः पापक्षालनाचे पाणी घेऊन त्यांच्यावर शिंपड. त्या प्रत्येकाने आपल्या पूर्ण शरीरावर वस्तरा फिरवावा आणि आपले कपडे धुवावे आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करावे.

तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”

याजक शुद्ध झाल्यानंतर, लोकांनी त्याच्यासाठी सात दिवस मोजावे.

¶ तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.