TSK

TSK · होशे 7:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मी या लोकांस का क्षमा करावी? तुझ्या मुलांनी माझा त्याग केला आणि त्यांनी जे देव नाही त्यांच्या शपथा वाहिल्या. मी त्यांना भरपूर खाऊ घातले, परंतू त्यांनी व्यभिचार केला आणि वारांगनेच्या घराचा मार्ग पकडला.

जर वाळवंटात माझासाठी एक ठिकाण असते, तर मी माझ्या लोकांस सोडून त्यांच्यापासून खूप दूर गेलो असतो, कारण ते सर्व व्यभिचारी आणि विद्रोही असे आहेत.

माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.

हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.