TSK

TSK · यश 20:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पाहा, मी व मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे व चमत्कारांसाठी जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत.

“मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडणी म्हणून दिला आहे, तुझ्यासाठी मी कूश व सबा यांची अदलाबदल केली आहे.

¶ परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.

मग मिसराविरूद्ध तलवार येईल आणि जेव्हा मारलेले लोक मिसरात पडतील तेव्हा कूशात वेदना होतील, ते तिची संपत्ती घेऊन जातील आणि तिचे पाये नष्ट होतील.

पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.