सकाळी तुम्ही म्हणाल, “ही रात्र असती तर बरे!” आणि रात्री म्हणाल, “ही सकाळ असती तर किती बरे!” तुमच्या मनातील भीती आणि डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी यामुळे असे होईल.
TSK
TSK · यश 21:3
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल. मी आपल्या अश्रूंनी हेशबोन व एलाले तुम्हास पाणी घालीन. कारण तुझ्या शेतातील उन्हाळी फळांनी आणि तुझ्या कापणीच्या आनंदाच्या आरोळीचा मी शेवट केला आहे.
जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.
पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल.
¶ त्या क्षणाला मानवी हाताची बोटे तिथे दिपस्तंभासमोर प्रगट झाली आणि त्यांनी राजवाड्यातील भिंतीच्या गिलाव्यावर असे काही लिहीले जे राजास वाचता येईल.
मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.