TSK

TSK · यश 22:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली.

आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.

¶ दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?

¶ ते त्यास म्हणाले, हिज्कीया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे, कारण जसे बालक जन्मायला तयार आहे, पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही.

तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत.

सियोनकन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरविले आहे. त्याने त्यावर दोरी ताणली आहे, आणि आपला हात संहार करण्यापासून आवरिला नाही. म्हणून त्याने तट व कोट ह्यास शोक करायला लाविला आहे. ते सर्वच व्याकूळ झाले आहेत.

जे परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय! तुम्हास तो दिवस का बरे पहावयाचा आहे? तो अंधार आहे, उजेड नाही.

तो दिवस क्रोधाचा, दु:खाचा व क्लेशाचा दिवस आहे, वादळ व नासधूस ह्यांचा दिवस आहे, उजाडीचा व ओसाडीचा दिवस, अभ्रांचा व अंधाराचा दिवस आहे.

‹तेव्हा ‘ते पर्वतास म्हणतील, आम्हावर पडा आणि ते टेकड्यांस म्हणतील. आम्हास झाका’›