TSK

TSK · यश 3:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.

(ती स्त्री यरूशलेमेच्या स्त्रियांशी बोलत आहे) सीयोनेच्या कन्यांनो बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा. त्या दिवशी तो खूप आनंदी होता.

त्या दिवशी प्रभू त्यांचे सुंदर असे पायातील दागिने, डोक्याचे बंध, गळयातील चंद्रकोरी हार,

मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.

पाहा! सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे. ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उध्दट, निष्काळजी, करुणाहीन, होती. तिने व तिच्या मुलीने गरजू व गरीबांना मदतीचा हात पुढे केला नाही.

“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”