TSK

TSK · यश 32:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक स्त्रीसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.

सर्व लोकांनो, हे ऐका. जगाचे सर्व रहिवासी, तुम्ही हे ऐका.

मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका, सावध असा, माझे शब्द ऐका.

सियोनेची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे.

मवाब लहानपणापासून सुरक्षित आहे. तो त्याच्या द्राक्षरसासारखा आहे त्यास या पात्रातून त्या पात्रात कधीच ओतले नाही. तो बंदिवासात कधी गेला नाही. म्हणून त्याची चव जितकी चांगली तितकी कायम आहे, आणि त्याचा वास न बदलता टिकून आहे.”

जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.

‹ज्याला कान आहेत तो ऐको.”›