TSK

TSK · यश 41:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो

आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.

परमेश्वर म्हणतो, “आता या, व एकमेकांशी संवाद करून हे जाणून घ्या; जरी तुमची पातके लाखेसारखी लाल असली, तरीही ती बर्फाप्रमाणे शुभ्र होतील; जरी ती किरमिजी रंगासारखी लाल असली, तरी ती शुभ्र लोकरीसारखी होतील.

¶ अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.

मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे.

¶ आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. मीखा त्यास म्हणाला, ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत.