TSK

TSK · यश 44:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परात्पर देवाने लोकांची विभागणी राष्ट्रा राष्ट्रांमध्ये केली. प्रत्येक राष्ट्राला स्वतंत्र भूभाग दिला. देवाने इस्राएल लोंकाच्या संख्येप्रमाणे राष्ट्राच्या सीमा आखल्या.

ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.

आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.

मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही. तुम्हीच माझे साक्षीदार आहात. मी देव आहे. असे परमेश्वर म्हणतो.

प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा, कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.

आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत.