TSK

TSK · यिर्म 33:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.

पण परमेश्वराने दाविदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दाविदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दाविदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दाविदाशी करार केला होता.

त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.

तेथे दावीदाच्या शिंगाला अंकुर फुटेल असे मी करीन; तेथे मी आपल्या अभिषिक्तासाठी दिवा ठेविला आहे.

तुम्ही कान द्या आणि माझ्याकडे या! ऐका, म्हणजे तुमचे जीवन जिवंत राहील! मी खरोखर तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, विश्वासाची कृती करून दावीदाशी करार केला.

तसेच माझ्यासमोर होमार्पणे अर्पिणारा, अन्नार्पणाचा यज्ञ करणारा व नित्य यज्ञ करणारा यांची लेवीय याजकास उणीव पडणार नाही.”

‹आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.›

त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.