TSK

TSK · यिर्म 39:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.

जे दृष्टीस पडेल त्याने तुम्ही चक्रावून जाल.

त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्यास जेरबंद करून बाबेलला नेले.

कारण माझ्या लोकांवर आलेली आपत्ती पाहून मी कशी सहन करू? माझ्या नातेवाईकांचा नाश मी कसा सहन करू शकेन?”

परमेश्वर असे म्हणतो, त्यानंतर, मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, त्याच्या अधिकाऱ्यांना, आणि जो कोणी मरीपासून, तलवारीपासून, दुष्काळापासून वाचला असेल, त्या सर्वांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती, त्यांच्या शत्रूंच्या हाती, आणि जे त्यांचा जीव घेऊ पाहतात त्यांच्या स्वाधीन करीन.

जे यहूदा आणि यरूशलेमेचे सरदार, षंढ, याजक व देशातले सर्व लोक जे वासराच्या दोन भागांमधून चालत गेले.

बाबेलाच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या डोळ्यापुढे मारले आणि यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांचीही त्याने रिब्ला येथे हत्या केली.

“परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, असे होईल की, मी राजाची मुले व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन आणि परदेशीय वस्रे घातलेल्यांनाही मी शिक्षा देईन.