TSK

TSK · यिर्म 49:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

रेफाई लोकांपैकी बाशानाचा राजा ओग तेवढा अजून जिवंत होता. त्याचा पलंग लोखंडाचा होता. तो पलंग तेरा फूट लांब आणि सहा फूट रुंद होता. अम्मोन्यांच्या राब्बा नगरात तो अजूनही आहे.

¶ वसंत ऋतूमध्ये ज्यावेळी राजे युध्द मोहिमांवर जातात त्यावेळी दावीदाने यवाबाला सर्व नोकरा चाकरांचा लवाजमा आणि समस्त इस्राएलांना अम्मोन्यांच्या संहारासाठी पाठवले. यवाबाच्या सैन्याने अम्मोन्यांच्या राब्बा या राजधानीच्या शहराला वेढा घातला दावीद मात्र यरूशलेम येथेच राहिला.

तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, यहूदाची कन्या हर्ष करोत.

याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील. अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील.

राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.

अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोकांस मुले नाहीत का? इस्राएलात कोणीही वारीस नाही काय? तर मिलकोमने गाद ताब्यात का घेतो आणि त्याचे लोक त्याच्या नगरात का राहतात?”

एका मार्गाला बाबेलाच्या सेन्यासाठी खुण करून ठेवा अम्मोनीच्या मुलाकडे राब्बा जवळ येण्यासाठी मार्ग सिध्द करा, दुसरी खुण यरूशलेमेच्या शहरा जवळ यहूदाच्या सेन्याकडे तट बंदीकडे निर्देश करा.

म्हणून पाहा! मी तुला पूर्वेकडच्या लोकांस त्यांची मालमत्ता देईन. ते तुमच्याविरुध्द छावणी देतील आणि आपले तंबू तुमच्यात देतील. ते तुझे फळ खातील व ते तुझे दूध पितील.

नेगेबचे लोक एसावाच्या पर्वतावर राहतील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राइमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील, बन्यामीन गिलादाचा ताबा घेईल.