TSK

TSK · यिर्म 49:39

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.

परंतु यानंतर मी अम्मोनी लोकांचा बंदिवास उलटवीन. असे परमेश्वर म्हणतो.

मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन, मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. मग तेथे त्यांचे हलके राज्य होईल.

म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, “आता मी याकोबाच्या लोकांस बंदिवासातून परत आणीन. इस्राएलाच्या सर्व घराण्यावर मी दया करीन. मी आपल्या पवित्र नावाबद्दल आवेशी राहीन.

¶ आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.

मी माझ्या लोकांस, इस्राएलाला, कैदेतून सोडवून परत आणीन, ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील, आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षांचे मळे लावतील. आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील.