TSK

TSK · ईयो 11:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.

रहबामाने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.

परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते.

तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील.

तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.

मी प्रार्थनेत आपले हात तुझ्यापुढे पसरतो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झाला आहे.

‹आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.›