TSK

TSK · योए 3:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.

शालेममध्ये त्याचा मंडप आहे, आणि सियोनेत त्याची गुहा आहे.

अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”

सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर, यरूशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.

हा मंदिरासाठीचा नियम आहे, पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अति पवित्र आहे. पाहा, हा मंदिराचा नियम आहे.

तो आपला शाही तंबू समुद्राच्या आणि पवित्र पर्वताच्या दरम्यान ठोकील. तो त्याच्या शेवटास येईल. पण कोणी त्यास मदत करणार नाही.

मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.

मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन, आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.” आणि आता व सदासर्वकाळ, मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन.

सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर!

¶ त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.