TSK

TSK · योहा 12:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्याने स्वत:साठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये, असे परमेश्वराने बजावले आहे.

आणि त्यास चाळीस पुत्र व तीस नातू होते; त्यांच्याकडे आपापले गाढव होते ज्यावर जे सवार होत होते; त्याने आठ वर्षे इस्राएलाचा न्याय केला.

राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षरस आहे.”

जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.

हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.

आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा, सियोन कन्येच्या टेकड्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल. यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.

“मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”

“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”