TSK

TSK · योहा 13:32

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ येशूने त्यांना म्हटले, ‹“मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.›

‹जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.›

परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.

¶ ‹ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.›

¶ नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.

‹मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.›