TSK

TSK · योहा 20:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ ‹लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.›

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‹“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.›

‹आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.›

‹मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”›

‹जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे.›

¶ मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, ‹“योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?”› तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, ‹“माझी कोकरे चार.”›

माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे.