TSK

TSK · योहा 5:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”

आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.

तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला.

मग येशू त्यास म्हणाला, ‹“जा! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”› लगेचच तो पाहू लागला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

¶ यावरुन यहूदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”

‹मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?›

आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.