TSK

TSK · योहा 7:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.

¶ ‹मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.›

‹ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन.›

‹कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.›

‹जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.›

‹मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.›