TSK

TSK · योहा 8:23

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे.

‹स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.›

¶ ‹जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.›

‹जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.›

पाहिला मनुष्य भूमीतून म्हणजे तो मातीपासून बनविला गेला, तर दुसरा मनुष्य स्वर्गातून आला.

हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.

¶ जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.

आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे.