TSK

TSK · शास्ते 13:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.

परंतु परमेश्वराचा आत्मा गिदोनावर त्यास मदत करण्यासाठी आला; गिदोनाने कर्णा फुंकला, तेव्हा अबीयेजेराचे वंशज त्याच्याजवळ अशाप्रकारे त्याच्यामागे जाण्यासाठी एकत्र आले.

नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.

मग तेथून, म्हणजे सरा व अष्टावोल यांतून दानाच्या कुळातले सहाशे पुरुष लढाईसाठी शस्त्रे घेऊन निघाले.

तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला.

कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.