TSK

TSK · शास्ते 2:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग ते मिस्पात जमले आणि त्यांनी पाणी काढून परमेश्वराच्या समोर ओतले. त्या दिवशी त्यांनी उपास केला आणि म्हटले, “आम्ही परमेश्वराच्या विरूद्ध पाप केले आहे.” तेव्हा शमुवेलाने तेथे इस्राएली लोकांचे वादविवाद मिटवले आणि लोकांचे मार्गदर्शन केले.

¶ एज्रा प्रार्थना करत असतांना आणि पापांची कबुली देत असतांना देवाच्या मंदिरापुढे पडून रडत व आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते लोक मोठ्याने रडत होते

ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.

“मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.

आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.

दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो.