TSK

TSK · विला 4:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

ते राष्ट्र तुमच्या नगरांना वेढा घालून हल्ला करील. आपल्या नगराभोवती असणारी उंच आणि भक्कम तटबंदी जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. ती पण तटबंदी कोसळून पडेल. तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या देशातील तुमच्या सर्व नगरांना शत्रू वेढा घालेल.

इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन फिरत होता. तेव्हा एका स्त्रीने त्यास मोठ्याने ओरडून म्हटले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरून मला मदत करा!”

ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मरण पावली तरी तिला त्याची पर्वा नसते काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते.

त्यांच्या शत्रूंनी आणि त्यांच्या जिवावर टपणारे, जो वेढा आणि यातना त्यांच्यावर आणतील, त्यामध्ये ते स्वत:च्याच मुलांचे आणि मुलींचे मांस खातील आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्यास खाईल, असे मी त्यांना करीन.

दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.

येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, ‹“यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा.›