TSK

TSK · लेवी 13:46

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;

वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसलो अहोत?

राजा उज्जीया कुष्ठरोगी झाला. परमेश्वराच्या मंदिरात त्यास मज्जाव होता. तो एका स्वतंत्र घरात राहू लागला. त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी बनला आणि लोकांचे शासन करु लागला.

यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे.

तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले

¶ मी तुम्हास माझ्या पत्रात लिहिले होते की व्यभिचाऱ्याशी संबंध ठेवू नका.

या पत्रातील आमचे वचन जर कोणी मानीत नसेल तर तो मनुष्य लक्षात ठेवा आणि त्यास लाज वाटावी म्हणून त्याची संगत धरू नका;

तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये,

‹परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”›