TSK

TSK · लेवी 2:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.

अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग त्याची क्षमा होईल; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचे उरलेले सपिठ याजकाचे होईल.”

अन्नार्पणातून जे काही उरलेले, व खमीर नसलेले अन्नार्पण अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी बसून खावे.

¶ दोषार्पण पापार्पणासारखेच आहे; त्या दोघांचे विधी एकच आहेत; जो याजक ह्याच्याद्वारे प्रायश्चित करील त्याचा त्या अर्पणावर हक्क आहे.

¶ मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;

मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.

लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.

त्यांना अन्नार्पण, दोषार्पण, पापार्पण ही त्यांनी खावी. इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.