TSK

TSK · लेवी 21:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ मोशेने अहरोन व त्याचे पुत्र एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्याना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;

त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये.

¶ जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.

मृताच्या जवळ जाऊन ते अशुद्ध होणार नाहीत, पण मृत पुरुष जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुद्ध झाले तरी चालेल.

¶ “आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे.