TSK

TSK · लेवी 22:32

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.

¶ तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.

¶ याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.

“अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की इस्राएल लोक ज्या वस्तू मला समर्पण करतात त्यापासून त्यांनी दूर रहावे व माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये. मी परमेश्वर आहे!

सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.

¶ ‹म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः› ‹हे आमच्या स्वर्गातील पित्या, › ‹तुझे नाव पवित्र मानले जावो.›

‹तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.›