TSK

TSK · लेवी 24:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.

कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते.

मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.

मंदिरातील मेजावर याजकांनी ठेवायच्या अन्नार्पणाची समर्पित भाकर, रोजचे अन्नार्पण आणि होमार्पण, शब्बाथ, चंद्रदर्शन आणि नेमलेले सण यादिवशी करायची अर्पणे, इस्राएलींच्या प्रायश्चितासाठी करायची पवित्रार्पणे आणि पापार्पणे, देवाच्या मंदिराच्या कामी येणारा खर्च या पैशातून द्यावा.