TSK

TSK · लेवी 6:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

सातही दिवस वेदीसाठी प्रायश्चित्त करून ती पवित्र कर म्हणजे वेदी परमपवित्र होईल, ज्याचा वेदीला स्पर्श होईल ते पवित्र होईल.

अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे होईल. परमेश्वरासाठी केलेले हे अर्पण परमपवित्र अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.

¶ दोषार्पणाविषयीचा विधी असा आहे: हे अर्पण परमपवित्र आहे.

लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.