TSK

TSK · लेवी 8:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.

त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.

मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.

परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.

मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.

मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.

तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यामध्ये अधिक उणे करु नका.

¶ कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हास दिले. प्रभू येशूचा, ज्या रात्री विश्वासघात करण्यात आला. त्याने भाकर घेतली,