TSK

TSK · लेवी 9:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले.

त्या ठिकाणी मी इस्राएल लोकांस भेटेन आणि माझ्या तेजाने मंडप पवित्र होईल.

मोशे व अहरोन दर्शनमंडपामध्ये गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांस आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांस दिसले;

गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्यास धन्यवाद दिले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्या सोबत त्यांनी उच्च स्वरात परमेश्वराची स्तुती केली. त्यांच्या गायनाचा आशय असा होता: “परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीती सर्वकाळ राहते.” तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले.