TSK

TSK · लूक 1:43

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेव्हा ती उठून भूमीकडे लवून नमली व म्हणाली, “पाहा तुमची दासी माझ्या प्रभूच्या चाकरांचे पाय धुवायला चाकरीण होण्यास तयार आहे.”

परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?

त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल.

त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.

आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”

इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा.