TSK

TSK · लूक 24:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग तो, जेथे मी उभा होतो, तेथे आला तेव्हा मी घाबरुन पालथा पडलो, तो मला म्हणाला, “मानवपुत्रा हा दृष्टांत समजून घे, हा शेवटच्या काळाविषयीचा आहे.”

¶ तो जो मनुष्यासारखा दिसत होता त्याने माझ्या ओठास स्पर्श केला व मी माझे तोंड उघडले आणि जो माझ्यापुढे उभा होता त्याच्याशी मी बोललो, “हे प्रभू या दृष्टांतामुळे माझे मन अधिर झाले आहे आणि माझ्यात बळ राहीले नाही.

त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.

त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला.

एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!”

‹आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.›