TSK

TSK · लूक 3:33

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले. म्हणून मग ती सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस!” आणि त्याचे नाव पेरेस असे ठेवले.

यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील. तुझा हात तुझ्या शत्रूंच्या मानेवर राहील. तुझ्या पित्याची मुले तुला लवून नमन करतील.

आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”

यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे पुत्र झाले. यहूदाचे हे पाच पुत्र होते.

¶ ऊथय हा अम्मीहूदचा पुत्र. अम्मीहूद हा अम्रीचा पुत्र. अम्री इम्रीचा पुत्र. इम्री बानीचा पुत्र. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा पुत्र.