TSK

TSK · लूक 6:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”

एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;

‹परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;›

तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.

त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?”

अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.

वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते तरी तुम्ही त्यांचे सहन करता.