TSK

TSK · लूक 7:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घालून करून प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”

मरण पावलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊ शकतो का? मी माझी सुटका होईपर्यंत वाट बघत राहीन.

तुझे मरण पावलेले जिवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा. कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.”

येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

‹कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.›

‹त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, ›

असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, ‹“लाजरा, बाहेर ये.”›

कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.