TSK

TSK · मार्क 10:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.”

लोकांस एकत्र जमवा, मंडळीला पवित्र करा. वडिलांना एकत्र करा, मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. वर आपल्या खोलीतून आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो.

¶ योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”

¶ आणि लोक आपल्या मुलांनाही त्याच्याकडे स्पर्श करण्यास आणत असता हे शिष्यांनी पहिल्यावर त्यांनी लोकांस धमकावले.