TSK

TSK · मार्क 12:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

इस्राएल आणि यहूदा यांना समज देण्यासाठी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे सांगितले होते की, “या वाईट मार्गातून फिरा आणि जे नियम तुमच्या पूर्वजांना मी आज्ञापिले होते व जे मी माझे सेवक आणि भविष्यवादी यांच्याकडून तुम्हास पाठवून दिले, त्या सर्वांप्रमाणे माझ्या आज्ञा व माझे नियम पाळा.”

त्या आज्ञा, तुझे सेवक जे संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हास दिल्यास. जेव्हा तू म्हणालास, तुम्ही ज्या देशात प्रवेश करून ताब्यात घेण्यास जात आहात तो अशुद्ध देश आहे. तो त्या देशाच्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकला आहे.

परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठवले, ते बाहेर जाण्यासाठी उत्सुक होते, पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.

¶ मग मी माझे सर्व सेवक संदेष्टे वारंवार पाठवत आलो. मी त्यांना सांगण्यासाठी पाठवले, ज्यांचा मी द्वेष करतो त्या तिरस्कारणीय गोष्टी थांबवा.

तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे फिरा!” हे सैन्यांच्या परमेश्वराचे वचन आहे; “म्हणजे मी तुमच्याकडे फिरेन.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

‹जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले.›

‹हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले.›

¶ देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला,