TSK

TSK · मार्क 13:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर.

दयाळू स्त्रीयांच्या हातांनी आपली मुले शिजविली, ती माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशसमयी ती त्यांचे अन्न झाली.

शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.

‹त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल.›