TSK

TSK · मार्क 14:54

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तिथे एका गुहेत शिरुन त्याने रात्र काढली. तेव्हा परमेश्वर एलीयाशी बोलला. तो म्हणाला, “एलीया, तू येथे का आला आहेस?”

¶ मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते.

पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.

आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”

त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला आणि त्याच्याभोवती बसले व पेत्रही त्यांच्यात बसला.

थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता.