TSK

TSK · मत्त. 16:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही.

‹ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.”›

¶ पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.

जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने एकत्र जमाल आणि तेव्हा आपला प्रभू येशू ह्याच्या सामर्थ्याने, माझा आत्मा तुमच्याबरोबर असेल,

म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.

¶ ‹फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः› ‹जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.›

या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.