TSK

TSK · मत्त. 16:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा.

¶ मग योनाला गिळण्यास परमेश्वराने एक मोठा मासा तयार केला होता. योना तीन दिवस आणि तीन रात्री त्या माशाच्या पोटात होता.

‹त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”›

आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, ‹“ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”›

¶ जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, ‹“ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही.›

परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”