TSK

TSK · मत्त. 21:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“सीदोनामधील सारफथ येथे जाऊन राहा, तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”

¶ पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने दिलेले वचन पूर्ण व्हावे याकरीता परमेश्वराने राजा कोरेश्याच्या आत्म्याला प्रेरणा दिली. कोरेशाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली, त्याने जे सांगितले व लिहिले होते ते असे आहे.

परमेश्वर आमच्या पूर्वजांचा देव धन्यवादित असो. यरूशलेमेमधील जे देवाचे मंदिर ते शोभिवंत करावे अशी इच्छा देवानेच राजाच्या मनात घातली.

कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.

आणि त्यास काही उणे आहे, म्हणून मनुष्यांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.

प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.