TSK

TSK · मत्त. 25:45

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.

जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.

जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही, तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.

‹मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.›

शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, ‹“मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे;›

¶ येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.