TSK

TSK · मत्त. 5:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तू आपला मार्ग तिच्यापासून दूर राख, आणि तिच्या घराच्या दाराजवळ सुध्दा जाऊ नको.

‹जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.›

‹जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत›‹तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल.›

‹परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता.›

‹मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?›

‹कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.›

आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.

पण मी माझे शरीर दाबाखाली दास्यात ठेवतो; नाही तर, दुसर्‍यांना घोषणा केल्यावर मी स्वतः, काही कारणाने, कसोटीस न उतरलेला होईन.

¶ तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जिवे मारा.