TSK

TSK · मत्त. 5:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो.”

मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”

यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.

‹यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.›

‹आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.›

¶ कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत.

¶ जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.

पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?

¶ शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.

¶ म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे.

¶ ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत,

¶ मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा.

¶ पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.

¶ माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा.

तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.